श्रीगोंदा दिनांक ४ ऑक्टोबर :
श्रीगोंदा शहरातील आनंदकर मळा येथील प्रगतीशील शेतकरी भिमराव आनंदकर यांच्या मुलीने बाजी मारत उत्तुंग यश मिळवले आहे .तिची नुकतीच नगर रचना विभागात सहाय्यक नियोजन अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे.या निवडीबद्धल तिचे सर्व स्थरांतून कौतुक केले जात आहे.
ज्योती हिचे पहिले ते चौथी शिक्षण शारदा विद्या मंदिर श्रीगोंदा येथे तर पाचवी ते दहावी चे शिक्षण श्रीमंत विजयाराजे शिंदे माध्यमिक विद्यालयात व आकरावी ते बारावी पर्यंत चे शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय येथे झाले.यानंतर चे शिक्षण तिने स्थापत्य आभियंता सिंहगड काँलेज पुणे येथे पुर्ण केले.
वडिल शेती करतात. तर, आई घरकाम करते. एकुलता एक भाऊ होता. मात्र, त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे . मेहनत आणि घरच्यांचे नेहमी प्रोत्साहन व शिक्षकांचे मार्गदर्शन,त्याचबरोबर मित्र मैत्रिणीची साथ या बळावर, आज हे यश मिळवले असल्याचे ज्योती अभिमानाने सांगते.
या निवडीचे शहरातील नागरिक कौतुक करित असून, सर्व क्षेत्रातुन तिचे अभिनंदन केले जात आहे.
या निवडीबद्धल सामाजिक कार्यकर्ते गोरखजी आळेकर यांनी अभिनंदन करीत, पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या आहेत.

