श्रीगोंदा दिनांक १ ऑक्टोबर
आज श्रीगोंदा तहसिल कार्यालया समोर विविध सामाजिक संघटनांनी व जोशींवस्ती येथिल नागरिकांनी पुढाकार घेत , लिंपंणगावातून वेगळी करण्यात आलेली भटक्या विमुक्त समाजाच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीला येथील काही राजकीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध दर्शविला आहे.भटक्या विमुक्त समाजाचे स्वतंत्र महसुली गाव झाले, म्हणून महराष्ट्रा शासनाच्या राजपत्रात गावाची नोंद झाल्याचा उल्लेख असतांना. असा विरोध दर्शविणे असंविधानिक असल्याचे अनेकांचे म्हणणे या आंदोलनाच्या निमित्ताने पुढे आले आहे . स्थानिक प्रशासनाने ही वारंवार या विषयात कायदेशीर बाजू मांडली आहे. मात्र, यातील नंदकुमार कोकाटे व त्यांचे समर्थक काही लोक लिंपंणगाव या गावातून जोशींवस्ती वस्तीला वेगळे करणे मान्य करीत नाहीत.या विषयांच्या अनुषंगाने आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर संबंधित इसमावर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करन्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन करन्यात आले.सदरील आंदोनल अँटी करप्शन युथ फोर्स व जोशी वस्थी स्वतंत्र महसुली गाव व्हावे ,तशेच येथील राहिवाश्यांना त्यांच्या मूलभूत सुविधां मिळाव्यात म्हणून, आलेल्या ग्रामस्थानच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. भालचंद्र सावंत ,शिवाजी पोटे ,चंदन घोडके ,सुनील ओहोळ ,राहुल भंडारी , बंडूशेठ लोणकर , फुलचंद सावंत ,रूपचंद सावंत ,दत्तात्रय सावंत ,लिपंणगावचे सरपंच अमोल साळवे ,उप सरपंच मिलिंद भोईटे ,कांतीलाल कोकाटे ,संजय सावंत ,जालिंदर घोडके, दीपक घोडके, भिवा वीरकर ,पांडुरंग जगदाळे,रमेश रंधवे ,भगवान शिंदे, नाना ससाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अश्या पद्धतीने भटक्या विमुक्तांच्या स्वतंत्र महसुली गावाला विरोध करणे म्हणजे येथल्या वंचित घटकांवर व त्यांच्या मूलभूत सुविधांवर गदा आणल्या सारखे आहे .असेही अनेकांचे म्हणणे आहे.
अश्या प्रकारे दूषित भावनेणें व स्वतःच्या स्वार्थासाठी गावाला वेठीस धरणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.या सह विविध मागण्यांचे निवेदन श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वतीने नायब तहसीलदार गायकवाड तसेच होगले साहेब यांनी व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या वतीने पो.कॉ.मांडगे आणि पो.कॉ.किरण जाधव यांनी स्वीकारले .चौकशी अंती कारवाई करण्यात येईल. असे अस्वासन प्रशासना मार्फत देण्यात आले आहे .यानंतर ,आंदोलन मागे घेण्यात आले ,असल्याचे आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे .
आंदोलना नंतर आंदोलनातील प्रमुखांनी पोलीस उप अधीक्षक सुदर्शन मुंढे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले .यावेळी अँटी करप्शन युथ फोर्सचे भालचंद्र सावंत ,बंडूशेठ लोणकर ,शिवाजी पोटे,पांढुरंग जगदाळे ,राहुल भंडारी, शिवाजी पोटे ,योगेश खेंडके ,सह ग्रामस्थ उपस्थिती होते.
(छायाचित्रे -फुलचंद सावंत)


