आदिवासी महिला विवस्त्र मारहाण प्रकरणी, दलित महासंघातर्फे श्रीगोंदा तहसीलदारांना निषेधाचे निवेदन सादर…

​श्रीगोंदा दिनांक २९ सप्टेंबर

१२ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील आदिवासी   पारधी समाजातील महिलेस शेळी शेतात गेल्याच्या किरकोळ कारणावरून विवस्त्र करून जबर मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ, दलित महासंघाने श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दलितांवरील अत्याचार दिवसें दिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासन फक्त बघ्यांची भूमिका घेत आहे. या घटना वेळच्या वेळी थांबल्या नाहीत तर, समाजा – समाजात अराजकता माजेल, यात शंका नाही. या संदर्भात दलित महासंघाच्या वतीने तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बुलाखे, चंद्रकांत सकट, रामा बोरगे, प्रमोद शेंडगे, प्रविण शेंडगे, बाळू बुलाखे, राहुल बोरगे, खुशाल सकट, दादा सकट, अमोल बोरगे, तसेच तालुक्यातील दलित महासंघाच्या कार्यकर्त्यां सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते .

Leave a Reply