दिनांक २५ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी चिंभळे गावातील पन्हाळा हॉटेलमध्ये जमिनीच्या वादातुन जयदीप सुरूमकर याने संतोष उर्फ लाला गायकवाड याला पिस्तूलातून सहा गोळ्या राउंड फायर केल्या होत्या.. ! त्यापैकी पाच गोळ्या लाला गायकवाड याला हात, मान, पोट, मांडी, खुबा इत्यादी ठिकाणी लागल्याने तो सदरच्या हल्ल्यात गंम्भीर जखमी झाला होता.
जखमीला उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी जखमीच्या चुलत भावाच्या फिर्यादी वरून बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४९१/२०२३ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सचिन सोपन भागवत याला गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती मिळवून पोलिसांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्ह्यातील पहिला आरोपी म्हणून अटक केले होते.
त्यानंतर घटनेतील मुख्य आरोपी जयदीप सुरूमकर याला दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी अटक करून तपासकामी बेलवडी पोलिसांनी दोन्ही आरोपीना कोर्टात हजर करत पोलीस कोठडी मिळवून तपास केला होता. फिर्यादीच आरोपी असल्याचे पुढे पोलीस तपासात सिद्ध झाल्याने एकूण तीन आरोपीना पोलिसांनी अटक केलेली होती व सदरचा गुन्हा हा तिन्ही आरोपीनी पूर्वनियोजित कट करून केल्याचे तपासात निष्पन्न करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले होते.
मा.जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा येथे आरोपी सचिन सोपान भागवत यांच्या वतीने ॲडव्होकेट रणजित शिरोळे यांनी जामीन अर्ज दाखल केला असता, सदर गुन्हा घडवून आणण्यासाठी शस्र पुरवल्याबाबत पोलिसांनी तपास करून, दोषारोपत्र दाखल केले आहे. असा युक्तिवाद सरकारी वकील ढगे मॅडम व जखमीच्या वतीने ॲडव्होकेट संग्राम देशमूख यांनी लेखी युक्तिवाद केला. परंतु, आरोपीचे वकील रणजित शिरोळे यांनी आरोपीचा सदर गुन्ह्यात कसा सहभाग नाही. याबाबत न्यायालयाला पुराव्याणीशी युक्तिवादतून सांगितले. दोन्हीही पक्षाचा युक्तिवाद ऐकून, मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख साहेब यांनी आरोपी सचिन सोपान भागवत याचा जामीन अर्ज मंजूर केला.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)
