दिनांक २५ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
पै.आप्पासाहेब सोनवणे (वस्ताद) व माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथंबीरे मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंद्यातील पारगाव रोडवरील महात्मा फुले उद्यान समोरील मैदानात भव्य राज्यस्तरीय निकाली जंगी कुस्तीचे मैदान भरवण्यात आले असुन “शहरासह तालुक्यातील तरुणांच्या मन.. मनगटात कुस्ती उतरविण्याचा प्रयत्न” मागील दोन वर्षांपासून सुरु केला असल्याचे पै. आप्पा सोनावणे व जनसेवक नानासाहेब कोथंबीरे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.
त्यासाठी उद्या दिनांक २६ जानेवारी देशाच्या प्रजासत्ताक दिनी दुपारी २:०० वाजता देश/विदेशातील नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा आखाडा पंचक्रोशीतील नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील, तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते दादा, माजी आमदार राहुल दादा जगताप, नागवडे सह. साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, बाबासाहेब भोस (ज्येष्ठ नेते), तहसिलदार हेमंत ढोकले, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, नगराध्यक्षा शुभांगीताई मनोहर पोटे, बाजार समितीचे राज्य सदस्य बाळासाहेब नाहटा, गटनेते बापू शेठ गोरे, तालुका भाजपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह टायगर ग्रुपचे तान्हाजी जाधव, पै.भैय्यासाहेब बंडगर, पै.अनिकेत घुले (मावळ), पै.संजुभाऊ खंडागळे (मुंबई), सह चांडाळ चौकडी करामती web series चे गणेश आण्णा लोणकर पाटिल विशेष उपस्थित राहणार आहेत.
या कुस्ती मैदानात पै.सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी), पै.शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय संकुल, पुणे), पै.गणी (इराण केसरी), पै.सोनू कुमार (पंजाब केसरी), पै.किरण भगत (उप महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय संकुल, पुणे), पै.माऊली जमदाडे (महान भारत केसरी, गंगावेस तालीम), पै. पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, कोल्हापूर), पै.गणेश जगताप (पुणे), पै. समीर शेख (पुणे), पै.बाला रफिक शेख (महाराष्ट्र केसरी, हनुमान आखाडा), देवा थापा (नेपाळ), पै.बंटी कुमार (हरियाणा), पै.अमित लाखा (हरियाणा), पै. विष्णू खोसे (युवा महाराष्ट्र केसरी, अहमदनगर), महिला पै.भाग्यश्री फंड (प्रथम महिला महाराष्ट्र केसरी), महिला पै.निशा तोमर (हरियाणा), महिला पै. धनश्री फंड (महाराष्ट्र चांपियन), महिला पै.श्रृंखला रत्नपारखी (औरंगाबाद), त्याचबरोबर लहान गटातील कुस्ती आकर्षण बाल पै.निखिल माने (सांगली), बाल पै.शंभु सुर्यवंशी (संभाजी तालीम, श्रीगोंदा) इत्यादी सह विविध ठिकाणचे पैलवान या सामन्यात उपस्थित राहणार आहेत.
सदरील स्पर्धेचे पंच म्हणून, पै.दिपक सोनवणे, पै.नंदु रेपाळे, पै.विष्णु राऊत, पै. नाना सोनावणे (वस्ताद), पै.संजय डफळ सर, पै.हनुमंत फंड व पै.नितिन मोरे कार्यरत असणार आहेत. तर, बारामतीचे प्रसिद्ध (नुसतच दुध डेअरीला घालू नका..! Fame) प्रशांत भागवत व युवराज सोनवलकर हे या सामन्यांचे निवेदक असणार आहेत. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे “खेळ मातीतला” या Facebook व YouTube चॅनल वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या आयोजनासाठी रमण सोनवणे, सिद्धार्थ भोसले, सुहास सोनवणे व शंकर सोनवणे सह पै.आप्पा सोनावणे मित्र मंडळ, श्रीगोंदा व श्री.नानासाहेब कोथंबीरे मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.
या स्पर्धा घेण्यामागे तरुणांना स्फूर्ती देणे हा उद्देश असुन, तालुक्यात कुस्तीचे मैदान लोपत चाललेले आहे. कुस्तीत तरूणांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्हीं प्रयत्नशील असल्याबाबत व्यवस्थापक/आयोजकांनी माहिती दिली आहे.
(अधिक माहितीसाठी:- ९४२२२३२१२१, ९४२२३३७०५३ वर संपर्क साधावा)
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

