लग्नाचे आमिष, शारीरिक संबंध आणि जीवे मारण्याची धमकी: माजी नगरसेवक सुनील वाळके आणि पत्नी मनीषा वाळके यांच्यावर गुन्हा दाखल..!

दिनांक ३ नोव्हेंबर २०२५,श्रीगोंदा:

अहिल्यानगर-औरंगाबाद हायवेवरील सारंगी हॉटेल अँड लॉजिंग आणि हॉटेल अशोक येथे तसेच पीडित महिलेच्या घरी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुनील भगवंत वाळके आणि त्यांची पत्नी सौ.मनीषा सुनील वाळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहे नोव्हेंबर २०१६ पासून ते १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पर्यंत या कालावधीत माजी नगरसेवक सुनील भगवंत वाळके (रा. मखरेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले तसेच, पीडितेसोबत काढलेले खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

या दरम्यान, त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत बळजबरीने संबंध ठेवले. आरोपीने पीडितेला शिवीगाळ व दमदाटी देखील केली.

https://amzn.to/3JHT1LZ

याबाबत पीडित महिलेने सुनील वाळकेची पत्नी मनीषा सुनील वाळके हिला माहिती दिली असता, मनीषा वाळके यांनी उलट पीडितेला ‘हात पाय तोडून फेकून देण्याची’ धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

या गंभीर आरोपांनंतर, माजी नगरसेवक सुनील वाळके आणि त्याची पत्नी मनीषा वाळके यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (ए) (बलात्कार), ६९ (लग्नाच्या खोट्या आश्वासनावर लैंगिक संबंध), ११५(२) (इच्छेने दुखापत करणे), ३५२ (गंभीर प्रकोपनाशिवाय हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (सामान उद्देषातून केलेले कृत्य) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) गणेश आहेरे हे करत आहेत.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading