नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सौर दिवे..! श्रीगोंद्यात ‘विकास की मतदारांना प्रलोभन’.?

दिनांक २ नोव्हेंबर २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा-अहिल्यानगर मतदारसंघाचे आमदार विक्रम सिंग पाचपुते यांनी त्यांच्या आमदार निधीतून (MLA Fund) मंजूर केलेले सुमारे १५ कोटी रुपयांचे सौर दिवे श्रीगोंदा शहराच्या राजकारणात सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरले आहेत.

नगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना, नगरपालिकेच्या हद्दीत हे सौर दिवे बसवण्याचे काम वेगाने सुरू झाल्यामुळे, सामान्य नागरिकांकडून आणि राजकीय वर्तुळातून एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवडणुकांच्या तोंवर सुरू झालेला हा विकास मतदारांना दाखवले जाणारे प्रलोभन तर नाही ना?

आमदार निधीचे १५ कोटीची, कामे गतिमान आमदार पाचपुते यांनी मतदारसंघातील विकासावर भर देत, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या हेतूने १५ कोटी रुपयांचे सौर दिवे श्रीगोंदा नगरपालिका कार्यक्षेत्रात बसवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. या निर्णयामुळे आमदार निधीतून शहरात प्रकाश योजना पोहोचेल, अशी अपेक्षा होती आणि सुरुवातीला या विकास कामांची वाहवाह देखील झाली.

सौर दिवे बसवण्याचे काम मागील काही दिवसांपासून शहरात सुरू आहे, परंतु मागील अनेक महिने हे काम धिम्या गतीने सुरू होते. मात्र, जसजशा नगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे हे काम अचानक गतिमान झाले आहे.

या गतिमान कामात आमदार समर्थक तत्कालीन नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. हे नगरसेवक वैयक्तिकरित्या प्रभागात लक्ष घालून, सौर दिवे त्यांच्या समर्थकांच्या दारासमोर किंवा ठराविक ठिकाणी बसवण्यासाठी आग्रह धरत असल्याचे चित्र आहे.

🛑 सवाल: श्रीगोंदा शहरातील रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत विकास कामे अनेक दिवसांपासून धिम्या गतीने चालल्याने अर्धवट राहिली असताना, केवळ निवडणुकांच्या तोंडावर आमदार निधीतून आलेल्या सौर दिव्यांना अचानक गती देणे आणि नगरसेवकांनी यात विशेष स्वारस्य दाखवणे, हे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखवल्यासारखे तर नाही ना?

https://amzn.to/3LpcIZr

हा प्रश्न आता श्रीगोंदा शहरातील सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे. विकास कामांची वाहवाह होत असली तरी, निवडणुकांच्या अगदी तोंडावर अशा कामांचे श्रेय घेणे आणि त्यांचा प्रचार करणे, हे राजकीय प्रतिस्पर्धकांसाठी ‘प्रलोभन’ म्हणून पाहण्याचा मुद्दा आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading