दिनांक १६ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा,अहिल्यानगर:
आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शाळेच्या जीर्ण अवस्थेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. अनिलजी ठवाळ तसेच आढळगावचे उपसरपंच अनुराधाताई ठवाळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांची भेट घेऊन ४८ लाख रुपयांच्या चार खोल्यांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश येताच जिल्हाधिकारी डॉ. आशीया यांनी तातडीने निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे शाळेत नवीन इमारतीचे बांधकाम होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.

गावकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, “आढळगावच्या शाळेच्या नूतनीकरणासाठी अनेक वर्षांचा संघर्ष आता सफल झाला आहे,” असे सांगितले. पालकांनी मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचा आनंद व्यक्त केला.

शाळेतील चार खोल्यांच्या बांधकामाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, जिल्हा प्रशासनाकडून कामकाजाच्या गतीने अंमलबजावणीसाठी आवश्यक पावले उचलली जातील.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

