खंडणी आणि बदनामीच्या धमक्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल.. पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद; २० लाख रुपयांची खंडणी आणि भूखंडाची मागणी..

दिनांक ४ नोव्हेंबर २०२५,श्रीगोंदा:

बदनामी करण्याची धमकी देत आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी खंडणी उकळल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२) आणि ३(५) नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी सचिन चंद्रकांत वाळके (वय ३२, रा. वाळकेवाडी, श्रीगोंदा) यांनी आरोपी अनिल तुकाराम मखरे, तुकाराम केरु मखरे, शांताबाई तुकाराम मखरे, निलेश तुकाराम मखरे, आणि एक अन्य (सर्व रा. मखरेवाडी, श्रीगोंदा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,

दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपींनी त्यांचे काका सुनील वाळके यांच्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि खाजगी क्षण दर्शवणारे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध न करण्यासाठी धमकी दिली. बदनामी टाळण्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून सुरुवातीला ५,००,०००/- (पाच लाख रुपये) रोख रक्कम खंडणी म्हणून घेतली.

https://amzn.to/4nyygjJ

ऑक्टोबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात, आरोपी अनिल मखरे याने बदनामी करण्याची धमकी खरी असल्याचे दाखवण्यासाठी आणि सुनील वाळके यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने, एक व्हिडिओ सोशल मीडियावर आणि स्थानिक स्तरावर व्हायरल केला.

त्यानंतर, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी, वरील सर्व आरोपींनी पुन्हा एकदा फिर्यादीकडे २०,००,०००/- (वीस लाख रुपये) रोख किंवा पर्यायी स्वरूपात त्यांचे काका सुनील वाळके यांच्या नावावर असलेला नगरपालिका इमारतीमागील जमीन/प्लॉट त्यांच्या नावावर करून देण्याची मागणी केली.

https://www.amazon.in/dp/B0FKYV9YP6/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_XQCEGMF2NGW43056RYSY?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=63ff70e18b39b6161a09a523034d01e5

ही मागणी पूर्ण न केल्यास खाजगी फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची तसेच खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींनी दिली आहे.

या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  भा. न्या. सं. क. ३०८(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.हे.कॉ. आप्पा तरटे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading