दिनांक ४ नोव्हेंबर २०२५, अहिल्यानगर/मुंबई:
राज्य निवडणूक आयोगाने आज (४ नोव्हेंबर २०२५) निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे.

आयोगाने आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यामुळे या क्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय शासनाला घेता येणार नाहीत. तथापि, नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची कोणतीही आडकाठी असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी कोणतीही घोषणा किंवा कृती अन्य ठिकाणीदेखील करता येणार नाही.

निवडणूक जाहीर झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अनेक पालिकांचा समावेश आहे. यात देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव, शिर्डी आणि श्रीरामपूर यांचा समावेश आहे. श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.


मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे कठोर पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)
