वन विभागाचा सावधानतेचा इशारा..! आढळगांव परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचा हैदोस; दोन व्यक्ती गंभीर जखमी, त्यातच बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत.!

दिनांक ४ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:

तालुक्यात आज (४ नोव्हेंबर २०२५) पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. आढळगाव, घुगल वडगाव आणि शहराच्या दरम्यान असलेल्या डी वाय बारा चारीजवळ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

शेतात राखणीला असलेल्या एका व्यक्तीला पिसाळलेल्या लांडग्याने तीन ते चार ठिकाणी चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना तातडीने शासकीय ॲम्बुलन्सने नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुर्दैवाने, त्याच लांडग्याने आणखी एका महिलेवरही हल्ला करत तिला जखमी केले आहे.

इतकेच नाही, तर याच वस्तीवर असलेल्या एका कुत्र्यावरही हल्ला चढवत त्याचे लचके तोडल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मा.जि प सदस्य अनिल ठवाळ यांना माहिती मिळताच त्यांनी वन विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर RFO दिपाली भगत मॅडम यांच्यासह वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

टीमने परिसरात गस्त सुरू केली असून, त्या पिसाळलेल्या लांडग्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, याच आढळगाव आणि घुगल वडगाव परिसरात बिबट्याचेही दर्शन झाल्याने या भागात वास्तव्यास असलेले नागरिक भयभीत झाले आहेत.

https://amzn.to/47zgAP6

लांडगा पिसाळलेला असल्याने तो त्याच्या अधिवास क्षेत्रातून लांबपर्यंत जाऊ शकतो. जवळच श्रीगोंदा शहर तसेच आढळगाव आणि घुगल वडगाव गाव असल्याने, श्री दिपाली भगत मॅडम यांनी स्थानिक आढळगाव/घुगल वडगाव आणि श्रीगोंदा शहरवासीयांना सावधानतेचे आवाहन केले आहे.

  • वन विभागाने या भागातील नागरिकांना विशेषतः काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका.
  • संध्याकाळनंतर शक्यतो बाहेर पडणे टाळा.
  • शेतात काम करताना गटागटाने आणि सावधगिरीने काम करा.
  • पाळीव जनावरांची काळजी घ्या. असे नमूद केले आहे.
  • स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading