राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न..

दिनांक १५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

आज दुपारी पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई महाविद्यालयाच्या समोरील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने श्रीगोंदा/नगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याचे आयोजन राहुल जगताप मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. मेळाव्यात राजकीय आणि सामाजिक समीकरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले.

कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आपला माणूस विधानसभेत पाठवण्याची मागणी व्यक्त केली. त्यांच्या मते, श्रीगोंदा मतदारसंघातून राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना उपस्थितांनी विद्यमान आमदारांवर आरोप केला की, पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी फक्त कागदावर वाटप केला गेला, मात्र प्रत्यक्षात फक्त ५० टक्केच निधी वापरण्यात आला आहे. तसेच, सामान्य शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.

राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटले असून, ९९ टक्के अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय बांधव त्यांच्या सोबत असल्याचा दावा याप्रसंगी करण्यात आला. मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या बाजूने जबरदस्त पाठिंबा व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी व्हाईस चेअरमन केशवभाऊ मगर होते, तर अजित जामदार यांनी अध्यक्षपदाच्या सुचना मांडल्या व बाबासाहेब जगताप यांनी त्या अनुमोदित केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थीत जनसमुदाय…

हरिदास शिर्के यांनी सांगितले की, “राहुल जगताप हेच आमचे उमेदवार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे नेण्यासाठी आपण सज्ज आहोत.”

दीपक भोसले म्हणाले, “मेळाव्याचे रूपांतर एका मोठ्या आंदोलनात झाले आहे. तालुक्यातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी राहुल दादाच सक्षम आहेत.”

जिजा बापू शिंदे यांनी सांगितले की, “मी माझे जीवन राहुल जगताप यांच्या कार्यासाठी समर्पित केले आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल लोखंडे आणि हरिदास शिर्के यांनी केले, तर प्रस्ताविक राजू पाटील यांनी सादर केले. राहुल जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि त्यांच्या भाषणात सांगितले की, “मी माणसे जोडली आहेत, हीच माझी ताकद आहे. आपण सर्वजण एकत्र राहून श्रीगोंदा तालुक्याचा विकास करणार आहोत.”

राहुल जगताप मेळाव्यास संबोधित करताना..

राहुल जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील राजकीय वातावरणावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “अनेकांनी आमदारकीच्या स्वप्नांत बॅनर, पोस्टर आणि जाहिरात बाजीवर भर दिला आहे. मात्र, आमदार होण्यासाठी यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणे आणि त्यांच्या सुखदुःखात सामील होणे आवश्यक आहे.”

राहुल जगताप यांनी पुढे असेही नमूद केले की, “मी माणसे कमवली आहेत आणि हिच माझी खरी संपत्ती आहे. तात्या आज माझ्यासोबत नसले, तरी त्यांचा आशीर्वाद तालुक्यातील जनतेच्या रूपात मला मिळत आहे.” ते म्हणाले की, “बापू आणि तात्या यांनी मला प्रसंगांना भेदण्याची ताकद दिली आहे, आणि मी जातीयवादी वृत्तीच्या लोकांसोबत कधीही गेलो नाही.”

त्यांनी तालुक्यातील काही जबाबदार लोकांवर विकासाच्या कामावर खोटं बोलत असल्याचा आरोप केला. “हे लोक खोटं बोलतात आणि त्यावर रेटून बोलतात, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचा विकास खंडित झाला आहे. अशा वेळी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला उभे राहावे लागेल,” असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी अतुल लोखंडे, डॉ.प्रनोती जगताप, दीपक भोसले, जिजा बापू शिंदे, अथर खान, विलास वाबळे, जितूशेठ मगर, तुषार नवले, गंगाराम दरेकर, बापू गायकवाड, पांडुरंग पोटे, तुळशीराम जगताप, कालिदास जगताप, अक्षय काळे, ऋषिकेश गायकवाड, संदीप उमाप, सतीश लगड, जितेंद्र पाटोळे, उत्तम डाके, विलास रसाळ, अनिल औटी, राजू मोटे, संजय जामदार, बाळासाहेब जगताप, विजय कापसे, ॲड. पुरुषोत्तम फाटे, आदिंसह बहुसंख्य  कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा जनसमुदाय मेळाव्यासाठी उपस्थित होता.

शिवाजी बापू नागवडे आणि कुंडलिक तात्या जगताप यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कुंडलिक तात्या जगताप यांच्या स्मृतींना आदरांजली व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे मेळावा यशस्वी ठरला.

यावेळी बैठक संबोधित करताना नेते…

स्रोत:(आयोजीत मेळावा)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading