दिनांक ९ जुलै २०२४, श्रीगोंदा:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर दक्षिण शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी बाळासाहेब दुतारे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. बाळासाहेब दुतारे यांनी यापूर्वी शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना उपशहर प्रमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख, आणि शिवसेना तालुकाप्रमुख या पदांवर काम केले आहे. कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून श्रीगोंदा तालुक्यामध्ये बाळासाहेब दुतारे यांची ओळख आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील ११४ गावांमध्ये बाळासाहेब दुतारे यांनी शिवसेनेचे मजबूत संघटन उभे केले आहे. ‘गाव तेथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हा सिद्धांत त्यांनी प्रत्यक्षात आणला आहे. या निवडीबद्दल बाळासाहेब दुतारे यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, खासदार निलेश लंके, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, घनश्याम आण्णा शेलार, राहुल दादा जगताप, बाबासाहेब भोस, भगवान फुलसौंदर, संदेश कारले, नगरसेवक योगीराज गाडे आणि विधानसभा संपर्कप्रमुख संजय खंडागळे यांनी बाळासाहेब दुतारे यांचे अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक, युवासैनिक, आणि महिला आघाडीमध्ये या निवडीबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






