धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ऋतुपर्ण साळवेची निवड..

दिनांक ९ जुलै २०२४, श्रीगोंदा:

रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाचा विद्यार्थी ऋतुपर्ण अमोल साळवे याने अहमदनगर येथे वाडिया पार्क मैदानावर संपन्न झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले असून, राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.

१५ वर्षाखालील वयोगटात ३६० पैकी ३२० गुण मिळवून त्याने सुवर्णपदक जिंकले. १४ ते १७ तारखेला अमरावती येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. ऋतुपर्णाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे साहेब, सर्व शिक्षक वृंद, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(पत्रकार आदेश उबाळे)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading