दिनांक १२ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभेत आता खऱ्या अर्थाने ट्विस्ट आला आहे. पैसे वाटूनही कार्यकर्ते जमा होईना अशी अवस्था उमेदवारांची झाली असताना राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारांची डोकेदुखी प्रादेशिक पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांनी केली आहे.
सध्या उमेदवार चांगलेच जोमाने कामाला लागले आहे. यात पाचपुते, नागवडे, जगताप, आळेकर, शेलार, पाचपुते, कोकाटे यांनी चांगलाच प्रचाराला वेग धरला आहे. गावागावात प्रचाराची रंगत वाढत आहे. सगळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
तालुक्याचा आमदार आपल्या मर्जितला असावा असे प्रत्येक कार्यकर्ते यांना वाटू लागले. सध्या श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात सर्वसामान्य मतदार शेतकरी वर्ग हा आज विचार करतोय कि कुकडी चे पाणी वेळेवर कोण आणू शकते?, एम आय डी सी तालुक्यात कोण आणू शकतो.?, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार कोण मिळवू देऊ शकतो?, पुणेकरांच्या ताब्यातील पाणी कोण आणू शकतो?, साकाळाई योजना पूर्ण कोण करू शकतो?, शेतकऱ्यांना मोफत सौर कृषी पंप कोण मिळवून देऊ शकतो?, शेतातील माल बाहेर देशात कोण पाठवू शकतो?, लिंबू शेतीला योग्य न्याय कोण देऊ शकतो?, श्रीगोंदा शहरात विकासाची गंगा कोण आणू शकतो?, प्रशासनातील ढिसाळ कारभार कोण सुधारू शकतो?..
या सर्व गोष्टीचा विचार आज मतदार करतोय आणि वरील गोष्टीला न्याय देण्याची क्षमता पाहूनच मतदान जनता करेल असे एकंदरीत दिसते. अशी क्षमता असणारे उमेदवार कोण आहे? हे पण पाहणे औचाताचे ठरेलं.
पाचपुते, नागवडे, जगताप या कारखानदाराला सर्वसामान्यांचे प्रश्नाचे काही घेणे देणे नाही. सर्व सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याची क्षमता १६ उमेदवारपैकी आळेकर यांच्यात आहे. कल्पक विचारधारेचे व्यक्तिमत्व म्हणून गोरख आळेकर यांच्याकडे पहिले जाते. सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी आळेकर जीवाचे रान करतील.. पण, सर्व सामान्याला न्याय देतीलच अशी धारणा आज सर्वसामान्य मतदारमध्ये आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




