श्रीगोंद्यात उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा..

दिनांक १२ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:०० वाजता श्रीगोंदा येथील श्री महंमद महाराज मंदिर पटांगणामध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी दिली.

श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या वतीने सौ. अनुराधा नागवडे या ” मशाल” चिन्हावर निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचारासाठी गुरुवारी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:०० वाजता शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा शेख महंमद महाराज मंदिर पटांगणामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर सभेकरिता राष्ट्रवादीच्या खासदार फौजीया खान, मराठा/मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष सुभान अली खान, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी, श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाबासाहेब भोस, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे.

स्रोत: (प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading