दिनांक १५ जुलै २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगर विधानसभेतील राजकारणाला नवे वळण देणारी एक महत्त्वपूर्ण घटना मुंबईत घडली. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी चव्हाण व श्रीगोंदा नगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. विक्रम (दादा) बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यात श्रीगोंदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच श्री. उत्तम (भाऊ) डाके, तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच श्री. संजय (अण्णा) निगडे, तांदळी दुमालाचे माजी सरपंच श्री. देविदास (तात्या) भोस, मढेवडगाव सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बंडू नामदेव मांडे तसेच बेलवंडी व तांदळी दुमाला येथील अनेक प्रमुख कार्यकर्ते भाजपात सामील झाले.

या वेळी भाजपचे जिल्हास्तरीय पदाधिकारी, श्रीगोंदा नगर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा आणि जयघोषांनी प्रदेश कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

“आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेते, कार्यकर्ते यांचे श्रीगोंदा नगर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यातही असेच अनेक नेते भारतीय जनता पार्टीत सामील होत असतील, हे निश्चित.”
— आमदार विक्रम (दादा) पाचपुते

“भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नेते, कार्यकर्ते यांचे श्रीगोंदा नगर विधानसभेतील कार्यकर्त्यांच्या वतीने व जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यातही असेच अनेक नेते भारतीय जनता पार्टीत सामील होत असतील, हे निश्चित.”
— आमदार विक्रम (दादा) पाचपुते

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
