दिनांक ३ जुन २०२४, श्रीगोंदा:
वयाची ६० वी पार केलेल्या आदिवासी समाजातील शिवल्या आणि कौसाबाई काळे या दाम्पत्यांनी खडतर परिस्थितीशी झुंज देत रेखा, पूजा आणि काजल या मुलींना उच्च शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे. यातील रेखाने बी.ए.(इंग्रजी) मध्ये ८१ टक्के गुण मिळविले. या लेकीच्या कौतुकासाठी अग्नीपंख फाउंडेशनने श्रीगोंदा ते बेलवंडी कोठार अशी १५ किमीची प्रेरणा सायकल वारी काढली. रेखा आणि तिच्या थकलेल्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काळे कुटुंबियांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरारळले.
रेखा आणि तिच्या आई-वडिलांचा श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, उपप्राचार्य शहाजी मखरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नवनाथ दरेकर, शहाजी खेतमाळीस, भाऊसाहेब खेतमाळीस, नवनाथ खामकर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन गोपाळराव डांगे यांनी केले.
रेखाचे बोल:
“लहानपणी मला शाळा बुडून भीक मागण्यासाठी मुंबईला नेले. त्यावेळी मी येथील परिस्थिती पाहिली आणि शाळा शिकण्याचा निर्णय घेतला. अन्यथा आज मी तिथेच भिक मागत बसले असते. अकरावीत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. माझ्या यशात माझे सर्व शिक्षक, आई-वडील, महामानव बाबा आमटे सेवा संस्था व अग्नीपंख फाउंडेशनचा मोठा वाटा आहे. आता अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे.”
सायकल वारीतील सायकलपटू:
प्रा.बापूसाहेब देवकर, प्रा.किरण ढवळे, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, ॲड.संपत इधाटे, मिठू लंके, अमोल हिरवे, भाऊसाहेब खेतमाळीस, प्रशांत एरंडे, गोपाळ डांगे, विनोद खेतमाळीस, डॉ.चंद्रकांत कोथिंबिरे, नवनाथ खामकर, देविदास खेतमाळीस, अभिषेक दंडनाईक, हौसराव भुजबळ, नवनाथ दरेकर, संदीप ढवळे, गौरी कोहळे, विजया लंके, सविता शिंदे, मनीषा काकडे सहभागी झाले होते.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)




