खून…! कपड्याने गळा आवळून फरफटत नेत, नाल्याजवळ झुडपात टाकले प्रेत..! किरकोळ वादातून वृद्धाचा खून.!..!

दिनांक १९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

मूळचे तालुक्यातील पिसोरे खांड येथील रहिवासी व सध्या लिंपणगाव येथे वास्तव्यास असलेले, बापू विष्णू ओहोळ हे हल्ली बाजारतळ परिसरात बांधण्यात आलेल्या नगर परिषदेच्या गाळ्यांसमोर आश्रयाला होते. नातेवाईकांनी अनेकदा घरी नेण्यासाठी प्रयत्न केले. तरीही ते जात नसत. त्यांना असलेल्या दारूच्या व्यसनामुळे ते या गाळ्यांसमोर राहून भीक मागून त्यांचे व्यसन सह उपजीविका भागवत असत.

दिनांक १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ८:०० वाजेच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन होऊन बाप्पू ओहोळ यांच्या गळ्याला कपड्याने फास देऊन, फरफटत नेत, नपा गाळ्यांच्या मागे नाल्याच्या कडेला झुडपात त्यांचे प्रेत टाकण्यात आले. याबाबत सुनिल भागचंद घोडके (मायताचा भाचा) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दवाखान्याच्या कामानिमित्त सुनिल भागचंद घोडके हे दौंडला गेले होते. सायंकाळी १०:०० वाजण्याच्या आसपास श्रीगोंद्यात आल्यावर, भोंगा आठवले यांनी सुनिलला फोन करून कळवले की, अण्णाभाऊ साठे चौकाजवळ असलेल्या नगरपरिषद गाळ्यांच्या बाजूला लेंडी नाल्याजवळ झुडपांत एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असून, ते ओहोळ मामा सारखे दिसत आहेत. ओळखण्यासाठी येतो का.?

त्यावरून सुनिल घोडके सदर ठिकाणी गेले. आधिच लोकं जमा झाले होते. पाहणी केली तर, ते बापू ओहोळ (मामा) असल्याचे सुनिल घोडके यांना खात्री पटली. लेंडी नाल्याच्या कडेला जखमी अवस्थेत चेहऱ्यावर रक्त व जखमा दिसल्या. त्यांना फरपटत नेल्याचे रक्ताचे डाग दिसत होते. बापू ओहोळ यांच्या शेजारी नगर परिषद गाळ्यासमोर झोपलेल्या रामसिंग तामचिकर यांच्याकडून व हजर लोकांपैकी नंदू ससाने यांच्याकडून समजले की, मामा ज्या ठिकाणी झोपले होते. तेथे नामदेव सुनिल भोसले उर्फ लंगड्या देखील झोपला होता.

नामदेव उर्फ लंगड्या अनं सुनिल ससाने यांचे रात्री ८:०० वाजता दारूसाठी पैसे मागण्या वरून भांडण झाले होते. त्यात नामदेव उर्फ लंगड्या याने सुनिल ससाणे याच्या नाकावर ठोसा मारल्याने त्याच्या नाकातून रक्त येत होते. त्यानंतर लंगड्याने ओहोळ यांना देखील दारू पिण्यासाठी पैसे मागितले. ओहोळ मामाने पैसे न दिल्याने, लंगडयाने मामाला देखील ठोसे मारून जखमी केले व गळ्याला कपड्याने आवळून फरपटत बंद गाळ्याच्या बाजूला लेंडी नाल्याच्या शेजारी झुडपात नेऊन टाकले. त्यात ते मयत झाल्याचे सुनिल भागचंद घोडके यांनी नमूद फिर्यादीत म्हटले आहे.

सुनिल घोडके, सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नामदेव सुनिल भोसले उर्फ लंगड्या याच्याविरुद्ध भादवि कलम २०१ व ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्त्रोत: (दिनांक १८ ऑक्टोबर २१ रोजी दाखल फिर्याद)..

Leave a Reply