दिनांक १९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
कर्जत उपविभागातील गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे या टोळी प्रमुखांसह टोळीतील ६ जणांविरुध्द मोक्का (mcoca) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून, ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया सक्रिय आहेत. त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे दाखल असणारे श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे या टोळी प्रमुखांसह टोळीतील चंदु भाऊसाहेब घावटे (वय २८ रा. राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), राजेंद्र बबन ढवळे (वय ३१, रा. राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), चेतन काळुराम कदम (वय २१, रा. देवदैठण ता. श्रीगोंदा), सागर विनोद ससाणे (वय २१ वर्ष रा. देवदैठण ता. श्रीगोंदा), राजु ऊर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा. कुरुद ता. पारनेर), शफिक शब्बीर शेख (वय ३४ रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) या टोळीने गुन्हे संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता तत्कालीन प्रभारी अधिकारी बेलवंडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिनांक २६ जून २१ रोजी (मोक्का) प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) यांचेकडे पाठविले होते. त्या प्रस्तावास दि.१५ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) यांची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली.
या टोळ्यांविरुद्ध दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, दरोडयाची तयारी करणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे, कट करुन व संगणमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करणे. आदि, प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर टोळीप्रमुख व साथीदार यांचे वर वेळोवेळी प्रतिबंध कारवाई करूनही टोळीची गुन्हेगारी वाढत असल्याने, या टोळीविरुध्द प्रचलित कायद्यानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (i), ३ (२) व ३ (४) (मोक्का) अन्वये कारवाई करण्याची मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग जि.अहमदनगर हे करीत आहेत.
स्रोत:(sdpo, कर्जत)

