दिनांक २१ जून,श्रीगोंदा:
बनावट इसम व त्याचे बनावट आधारकार्ड तयार करुन, तो मूळ मालक असल्याचे भासवून, बोगस शेतजमीन/ प्लॉट यांची खरेदीखत/विसार पावती, दस्तएवेज बनवून, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल १) गु.र.नं. ७४९/२०१९ भा.द.वी.क. ४२०, ४६७, ४६८ वैगरे २) गु.र.नं. ११२१/२०१९ भा.द.वी.क. ४२०, ४६७, ४६८ वैगरे ३) गु.र.नं. ११/२०२० भा.द.वी.क. ४२०, ४६७, ४६८ वैगरे व ४) गु.र.नं .१०६/२०२० भा.द.वी.क. ४२०, ४६७, ४६८ वैगरे प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये बनावट इसम व त्याचे बनावट आधारकार्ड तयार करुन, तो शेतजमीन/प्लॉटचा मुळ मालक असल्याचे भासवुन फसवणुक केले असलेबाबत दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास चालु असताना, दिनांक १२ जून रोजी पुन्हा अशा प्रकारचाच गु.र.नं ५४३/२०२० भा.द.वी.क ४६५, ४६७, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा आण्ण्णा साहेब आप्पाजी तारडे रा. गाडकवाडी पो. तहाराबाद ता. राहुरी जि.अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.
एकापाठोपाठ असे गुन्हे दाखल होवु लागल्याने गु.र.नं. ५४३/२०२० भा. द. वी. क ४६५, ४६७, ४६८, ३४ प्रमाणेचा गुन्हा पोलीस निरीक्षक जाधव यांनी तपासकामी स्वत:कडे घेवुन गुन्हयामध्ये दिनांक १५ जून रोजी आरोपी भगवान छबु राऊत रा. बोरुडेवाडी श्रीगोंदा ता. श्रीगोंदा, नवनाथ मारुती भुजबळ रा. शिक्रापुर यांना अटक करुन त्यांचेकडे चौकशी करुन सदर गुन्हयाचा आठ दिवसात छडा लावत गुन्हयामध्ये पुराव्यानिशी आरोपी एस एस साबळे रा. बारामती ता. बारामती, रामभाऊ पाराजी कौठाळे रा. श्रीगोंदा, मारुती नाना गव्हाणे रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा (निष्पन्न अनोळखी बनावट इसम), सपंत उबाळे पुर्ण नाव माहीत नाही रा. हिगंणी ता. श्रीगोंदा, संतोष कोडींबा वाखारे रा. हिगंणी ता. श्रीगोंदा, बापु बलभिम निभोरें रा. घोटवी ता. श्रीगोंदा, सत्यवान मारुती गव्हाणे रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा (निष्पन्न अनोळखी बनावट इसम यांचा मुलगा) सहभाग असल्याचे निष्पन्न करुन, बनावट इसम उभा करुन तो मुळ मालक असल्याचे भासवुन शेतजमीन/प्लॉट यांची बोगस खरेदीखत/विसार पावती दस्तएवेज बनवणाऱ्या आरोपीची टोळी निष्पन्न झाली आहे.
सदरची कार्यवाही श्री. अखिलेश सिंह (पोलीस अधिक्षक अहमदनगर), श्री.सागर पाटील(प्रभारी पो. अधिक्षक), श्री. सजंय सातव, (उप-विभागीय पो. अधिकारी, कर्जत उप विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दौलतराव जाधव (पोलीस निरीक्षक श्रीगोदा पोलीस स्टेशन यांचे सोबत, पो. कॉ. राजु भोर, पोहेकॉ. रोहीदास झुजार, पोना. भारत खारतोडे, पोका योगेश भापकर, पोकॉ किरण जाधव, मपोकॉ गितांजली लाड तसेच मोबाईल सेल अहमदनगर येथील पोकॉ शिदे व पोकॉ राठोड यांनी केली आहे.
स्थानिक पोलीस प्रशासनाने नागरीकांना आवाहन केले आहे की, जमीन व्यवहार करताना अशा बनावट इसम व त्याचे बनावट आधारकार्ड यावरुन तो मुळ मालक असल्याचे भासवुन बोगस शेतजमीन/प्लॉट यांची खरेदीखत/विसार पावती दस्तएवेज होवुन आपली फसवणुक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच, काही आक्षेपार्ह भासत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा अश्या सूचना श्रीगोंदा पोलीस ठाण्यामार्फत वरील प्रकरनांच्या आधारे देण्यात आल्या आहेत.
