श्रीगोंदा शहरात आढळले आणखी तीन कोरोना रुग्ण. शहरात एकूण रुग्ण संख्या ५..

दिनांक २१ जून,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरांमध्ये आज आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. शहरात यापूर्वी आढळलेल्या साळवनदेवी रोड लगत परिसरात दोन पुरुष निदर्शनास आले असून, श्रीगोंदा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काळकाई चौकामध्ये एक महिला कोरोना बाधित आढळल्याचे समजले आहे.

वाढती रहदारी आणि होणारी गर्दी यामुळे श्रीगोंदा शहरामध्ये या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजार तळावर या गर्दीत सामाजिक अंतराची रोज वाट लावली जात आहे. हेही नवीन राहिलेले नाही.

आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आणखी तीन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. साळवनदेवी रोड लगतचे पती,पत्नी तसेच या तीन लोकांना मिळून शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव असलेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे.

सामाजिक अंतर राखत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे, आता गरजेचे झाले असून, श्रीगोंदा शहर वाशियांपुढे वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रत्येकानेच आपली जिम्मेदारी स्वीकारणे अनिवार्य झाले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading