श्रीगोंदयात ब.स.पा.कडून हाथरस घटनेचा निषेध..

दिनांक ५ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

हाथरस येथील अत्याचार घटनेचा देशभर निषेध नोंदवण्यात येत आहे. १९ वर्षीय वाल्मीक मेहतर समाजाच्या मागासवर्गीय पीडितेवर झालेल्या गैरवर्तणूकीचा संबंध देशभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातूनही नमूद घटनेबाबत निषेध निवेदनं देण्यात आली आहेत. बहुजन समाज पार्टीच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी स्थानिक प्रशासनास निवेदन देऊन, घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने आंदोलकांसह पीडित कुटुंबासोबत केलेल्या गैर वर्तुणुकीचाही निषेध करण्यात आला आहे.

देशभरामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सामान्य समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले असताना, याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारे शांत आहेत. स्थानिक प्रशासन यंत्रणा शासनाच्या इशारा वरती वागत असून, केंद्र सरकार व राज्य शासन जातीवादी भूमिकेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हाथरस येथील अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालय मध्ये चालवत गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, पिडीत कुटुंबाला न्याय देण्यात यावा, संरक्षण देण्यात यावे, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या विविध मागण्यांसह नमूद घटनेचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहे. श्रीगोंद्याच्या तहसीलदार चारुशिला पवार व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना याबाबतचे निवेदन देतांना, सुनिल ओहोळ, त्र्यंबक साळवे, अक्षय ससाणे, स्वप्निल पवार, संतोष काळे, विनायक काळे, रोहित साळवे, युवराज साळवे, राहुल छत्तीशे, प्रवीण सोळंकी आणि सुमन चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिध्दीस दिलेले निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading