ज्वारी बियाणे तयार करण्याची परंपरा..

श्रीगोंदा तालुका पुर्वी ज्वारीच्या आगारासाठी प्रसिध्द होता पण कुकडी घोडच्या पाण्याखाली श्रीगोंद्यात ७२ % क्षेत्र ओलिताखाली आले आणि ऊस आणि फळबागा मोहरल्या आशा परिस्थितीत देवदैठण येथील लक्ष्मण दत्तात्रय लोखंडे यांनी दरवर्षी महाबीज कंपनीसाठी ज्वारी बाजरीचा बियाणे प्लाट तयार करतात त्यामुळे लोखंडे परिवाराने ज्वारी बाजरीचे बियाणे करण्याची परंपरा जोपासली आहे.

लक्ष्मण लोखंडे यांना जयसिंग, सुरेशराव जालिंदर हे तीन भाऊ आणि १७ सदस्याचे कुंटूब बंधू जालिंदर व पुतण्या दिपक यांची शेतीत भक्कम साथ. त्यामुळे ४० एकराच्या मळ्यात आंबा, चिक्कु, डाळिंब बागांनी मळा बहरला असुन पेरू लागवडीचे नियोजन केले.

लक्ष्मणराव शेती पाहतात त्यांचे बंधू सुरेशराव तालुक्याच्या राजकारणात सक्रिय तर सुनबाई कल्याणी पंचायत समिती सदस्या तर मुलगा अतुल ग्रामपंचायत सदस्य आणि दुधाचा व्यवसाय पाहतो त्यामुळे या कुंटुबाने राजकारणातून समाज सेवा चालविली आहे.

देवदैठण गावात कुकडीचे पाणी आले आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या भाग्यरेषा बदलल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे पिके करून गावच्या कृषी विकासाला चालना दिली. त्यामुळे देवदैठण परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. लक्ष्मणराव लोखंडे शेतीचा पिक बदलत असताना श्रीगोंदा तालुक्याच्या मातीला गोडी असलेल्या ज्वारी, बाजरी पिक पेरण्याची परंपरा चालू ठेवली आहे. महाबीज कंपनीने सुरूवातीला लोखंडे यांचे ज्वारीचे बी नेले आणि या बियाणांवर प्रकिया केली. त्यानंतर पुन्हा बियाणे लोखंडे यांना दिले. लोखंडे बंधूंनी देवदैठण येथे कसदार मातीत दर्जेदार ज्वारीचे बियाणे तयार करण्याचे काम चालू ठेवले त्यामुळे लोखंडे यांच्या शेतात तयार झालेले बियाणे महाराष्ट्रभर पोहचले आहे.

संदेश

माणुस काळाच्या ओघात बदलला तसा त्याने पिक पध्दतीत बदल केला संकरित बियाणे वाणांचा स्विकार केला त्यामुळे गावरान अन्न धान्याच्या जाती झाल्या मानवाला सकस आहार मिळण्यासाठी गावरान जाती पेरण्यासाठी चालना मिळण्याची गरज आहे. पुन्हा गावरान वाणांना चांगले दिवस येणार आहेत. दुध म्हशीचे अथवा गावरान गिर गायीचे ग्राहक मागतात. ते सहज मिळत नाही. आता पुन्हा जुनं ते सोने येणार हे निश्चित आहे. लक्ष्मण लोखंडे देवदैठण.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading