अहमदनगर दि.१० – कर्जत उपविभागातील कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील एकूण ५३ गावातील पोलिस पाटील रिक्त पदे भरण्यासाठी तहसील कार्यालय, कर्जत येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वी पोलिस पाटील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतू राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकामुळे आचार संहिता लागू करण्यात आल्यामुळे पोलिस पाटील भरती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
आता महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर २०१८ रोजी तहसिल कार्यालय, कर्जत येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या महिला आरक्षण सोडत कार्यक्रमास कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, कर्जत येथे संपर्क साधावा, असे उप विभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
