युवकांनी देश सेवेमध्ये योगदान देऊन, आपला देश बळकटीसाठी पुढे यावे: श्री.कमलाबाई शिंदे..

दिनांक २७ जानेवारी(मढेवडगाव,श्रीगोंदा):

प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून भारत स्वतंत्र होण्यासाठी इंग्रज सरकार विरोधात वेगवेगळ्या चळवळीत सहभाग घेऊन, स्वतंत्र भारतासाठी योगदान दिलेले, श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील थोर स्वतंत्र सैनिक कै. दिनकर शिंदे यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई दिनकर शिंदे यांचा साडी चोळी देऊन महराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत भैय्या ओगले यांनी सन्मान केला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी मढेवडगावचे सरपंच सौ. महानंदा ताई मांडे, (उपसरपंच) जयश्री धावडे, (माजी उपसरपंच) कल्याणी गाढवे, सचिन गायकवाड, गणेश कविटकर, सुहास कुलकर्णी, फुलशिंग मांडे सर, संदीप मांडे, दीपक गाढवे, अमोल गाढवे, भगवान धावडे हे उपस्थित होते.

युवकांनी देश सेवेमध्ये योगदान देऊन आपला भारत देश अधिका अधिक कसा बळकट होईल, यासाठी पुढे आले पाहिजे. असे मत श्रीमती कमलाबाई शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. तशेच, सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

स्रोत:(प्रशांत भैय्या ओगले यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading