दिनांक १९ ऑगस्ट, श्रीगोंदा:
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा श्रीगोंदा मुले, मुली व श्रीगोंदा उर्दू यांच्या संयुक्तपणे सकाळी ७.३० वाजता श्रीगोंदा मुले केंद्राचे प्रमुख श्री.गजानन ढवळे साहेब याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीगोंदा मुले, मुली व उर्दू सदस्य पालक उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश श्रीगोंदा उर्दू शाळेत मा.आ.श्री.राहुल दादा जगताप (कुकडी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष) यांनी अचानक भेट दिली यावेळी श्री. हरिदास आबा शिर्के (पंचायत समिती श्रीगोंदा मा. उपसभापती) श्री.फक्कडराव मोटे (मा.उपनगराध्यक्ष श्रीगोंदा) श्री.अख्तर भाई शेख (मा.उपनगराध्यक्ष श्रीगोंदा) आ.राहुल दादा जगताप यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट, चॉकलेट इतर खाऊ वाटप केले.
शाळेचा परिसर, वर्ग खोली, कॉम्प्युटर लॅब पाहून त्यांनी आनंद व्यक्त करत, ते म्हणाले तुम्ही सर्व शिक्षकांनी चांगले गुणवत्ता पुर्ण शिक्षण द्या. शाळेला तीन अतिरिक्त वर्ग खोली मंजूर करण्यात येईल, असे जाहीर केले.

यावेळी हरिदास आबा शिर्के यांनी शाळेला मदत करू असे आश्वासन दिले. शाळेतील पालक रियाज शेख, मुजफ्फर शेख (शा.सू.समिती सदस्य), मौलाना मोहोयुद्दीन अत्तार, रिजवान जमादार याच्या हस्ते झाडं लावण्यात आले. Cctv camera gift to urdu school, assurance of help from dignitaries ..
रिजवान जमादार यांच्या हस्ते शाळेला c.c.tv कॅमेरा भेट दिले. मौलाना शमीम कादरी डॉ.जमादार, डॉ.सय्यद, डॉ.मझहर सय्यद, निसार शेख (रंगोली प्रिंटर्स), अंतरराष्ट्रीय पत्रकार आरिफ शेख, अयनोद्दिन शेख सर, निसार बेपारी (नगरसेवक), शब्बीर कुरेशी (मा. नगरसेवक), हाजी रऊफ शेख, जैनोद्दिन अत्तार, शकील जमादार, इकबाल मुजावर (इचलकरंजी), सलीम शेख (दुबई), शाळेतील शिक्षक मोमीन सरांनी शाळेबाबत माहिती दिली. आस्माबी मुल्ला मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर, यासीन सर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका समीनाबानो साचे यांनी सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार मानले.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
