घन:शाम शेलार यांच्या “राष्ट्रवादी भवन” या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन..

दिनांक १९ ऑगस्ट,श्रीगोंदा:

आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच, अहमदनगर जिल्हा पक्ष निरीक्षक सौ.वर्षाताई शिवले यांच्यासह महिला तालुकाध्यक्ष सौ.मीनल ताई भिंताडे, युवती रा.काँ.च्या तालुकाध्यक्ष अध्यक्ष Ad.दीपाली बोरुडे यांच्यासह तालुक्यातील सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शनिचौक येथे केले.

यावेळी विधान परिषदेचे सदस्य सुधीरजी तांबे, माजी आमदार राहुल जगताप, श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, रा.काँ.चे माजी तालुकाध्यक्ष संजयजी आनंदकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक भोसले, रा.काँ. युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे इ. उपस्थित होते.

यावेळी आयोजित मेळाव्यात घन:शाम शेलार यांनी बोलतांना नवनिर्वाचित महिलांनी आगामी निवडणुकांमध्ये संघटनात्मक शक्ती वाढवून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कार्यक्रमात वर्षाताई शिवले, राहुल जगताप, रंगनाथ बिबे, मीनल भिंताडे, दिपाली बोरुडे, आशाताई साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. Inauguration of ghan Sham Shelar’s “Rashtravadi Bhavan” public relations office.

मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला तसेच, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.काँ.च्या अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अजिमभाई जकाते यांनी केले तर दिपाली बोरुडे यांनी आभार मानले.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading