दिनांक ३० जुलै, श्रीगोंदा:
शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश श्रीगोंदा उर्दू येथे चंदन घोडके (बहुजन समता पत्रचे संपादक) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, मास्क, सॅनिटायझर देत त्यांचा वाढदिवस साजरा केला.

या प्रसंगी मानव विकास संशोधन केंद्र पुणे या संस्थेचे पदाधिकारी फुलचंद सावंत हे प्रमुख पाहून म्हणून उपस्थित होते. मानव विकास संशोधन केंद्राच्या माध्यमांतून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी हृदय भाऊ घोडके (नगरसेवक), सौ. उषा फुलचंद सावंत (ग्रामपंचायत सदस्य, लिंपणगाव), विशाल(भाऊ) घोडके (RPI पदाधिकारी आठवले गट), श्री. नामदेव थोरात, श्री. रवींद्र ठोकळे, श्री. राहुल भंडारी, श्री. ऋतिक सावंत उपस्थित होते.

शाळेच्या वतीने (शा.सू.समिती अध्यक्ष) अख्तरभाई शेख यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन चंदन घोडके यांचा सत्कार केला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. Celebrate birthday by distributing notebooks, pens, pencils, masks, sanitizers to the students of the school.
या प्रसंगी शिक्षक मोमीन सर, मुल्ला मॅडम, शेख सर व पालक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका साचे समीनाबानो यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्रोत:(मोमीन सर व आयोजित कार्यक्रम)
