छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मान्यवरांचा सत्कार उत्साहात साजरा..
01 mins
छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मान्यवरांचा सत्कार उत्साहात साजरा..
दिनांक २१ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
जामखेड येथील बीड रोड समता भुमी निवारा प्रकल्पातील निराधार वंचित मुलांसाठी मदत म्हणून चीप्ट भर धान्य द्या.:अँँड.डॉ.अरुण जाधव.
ग्रामीण विकास केंद्र संस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रथम महिला समस्या नोंद केंद्र श्रीगोंदा येथे शिवजयंती साजरी केली.यावेळी,बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँँड.डॉ.अरुण जाधव यांनी जामखेड,समता भूमी,मोह फाटा या ठिकाणी चालू असलेल्या निवारा प्रकल्पातील निराधार वंचित घटकातील ऊसतोड कामगारांच्या त्यांना आई-वडील नाहीत अशा,विट भट्टी कामगार,लोक कलावंत, मुलांना जमेल तसं चिप्ट भर धान्य या अनाथ लेकरांसाठी द्या.असे आव्हान समाजातील प्रत्येक घटकास केले व छत्रपती शिवाजी राजेंना अभिवादन करून,बोलताना जाधव म्हणाले की,समानता, धर्मनिरपेक्षता,सर्वांना समान संधी व स्त्रियांचे रक्षण असे शिवाजी महाराजांना अपेक्षित होते.तेच काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून करावे.
यावेळी प्राचार्य बाळासाहेब बळे सर,राहुल साळवे, अंकुश शिंदे,बापू ओहोळ,संतोष भोसले आणि भगवान राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून दोन व्यक्तींचे सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे श्रीगोंदे तालुका कार्यकारिणीची निवड झाली त्याबद्दल अंकुश शिंदे यांची ग्रामीण विकास केंद्र,जामखेड संस्थेच्या वतीने संविधानाची उद्देशिका,गुलाबाचे फुल देऊन एक आगळा-वेगळा सत्कार करण्यात आला.तसेच माणुसकीचे दर्शन घडवणारे राहुल साळवे यांनी सुमारे तीन वर्षांपासून छत्तीसगड राज्यातील कोरीया जिल्ह्यातील बेपत्ता तरुणाला त्याच्या स्वगृही सुखरूप घरी पाठवले.त्यांच्या या सामाजिक कार्याचे गौरव म्हणून,ग्रामीण विकास केंद्र या संस्थेने त्यांचाही संविधानाची उद्देशिका, गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.
जामखेड येथील निवारा महोत्सव या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल प्रा.बळे सर यांनाही आभार पत्र दिले .यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँँड.डॉ.अरुण (आबा) जाधव , संचालक बापू ओहोळ सर,भगवान राऊत,बळे सर , सचिन भिंगारदिवे ,सागर भांगरे,संतोष भोसले,छाया भोसले,सुनिता बनकर,उज्वला भवाळ,यशोदा काळे, संगीता राऊत,मनीषा शिनगान,सुनंदा घालमे, रूपाली भिसे,यमुना ननवरे,प्रमिला फरांडे,पुष्पा कुसळकर,लता सावंत,काजोरी पवार,ज्योती भोसले, कांतीलाल कोकाटे,मनिषा काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान राऊत व आभार बापू ओहोळ यांनी मानले.