१५ कोटीची भाषा करणारे “छत्रपतींचा एकच मावळा लाखाला भारी पडतो” हा तेजस्वी इतिहास विसरलेत का ? – शंभुसेना संघटना..
01 mins
१५ कोटीची भाषा करणारे “छत्रपतींचा एकच मावळा लाखाला भारी पडतो” हा तेजस्वी इतिहास विसरलेत का ? – शंभुसेना संघटना..
दिनांक २१ फेब्रुवारी,पुणे:
नुकतेच एमआयएमचे नेते व माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या भाषणात मुस्लिमांना चिथावणी देत “आपण १५ कोटी असलो तरी १०० कोटींना भारी पडू” असे बेजबाबदार पणाचे विधान केल्याने त्यास सडेतोड प्रतिउत्तर देत. “१५ कोटी भारी पडतील अशी भाषा करणारे “छत्रपतींचा एकच मावळा लाखाला भारी पडतो” हा शिव-शंभुराजांच्या भूमितील तेजस्वी इतिहास विसरले आहेत का ? असा खोचक प्रतिसवाल शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात विविध आंदोलनं सुरू आहेत, सीएए, एनआरसी विरोधात गेल्या दोन महिन्यां पासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे.भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटक येथील गुलबर्गामध्ये भाषण केलं होत या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात “आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल, जेव्हा जी गोष्ट मागून मिळत नसेल, तेव्हा ती हिसकावून घ्यावी लागेल, आता ती वेळ आलेली आहे आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्ही देखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा असे म्हणत आम्ही १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींना भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा” असे चिथावणी खोर वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं होत.
त्याला उत्तर म्हणून शंभुसेना संघटनेने त्याला जोरदार प्रतिउत्तर देत त्यांना “एक मराठा..लाख मराठा” हा छत्रपतींच्या भूमितील कणखर इतिहास माहीत नाही का ? देश हितासाठी वेळप्रसंगी “छत्रपतींचा एकच मावळा लाखाला भारी पडतो” हा शिव-शंभुराजांच्या भूमितील तेजस्वी इतिहास असून “१५ कोटी भारी पडतील अशी भाषा करणाऱ्यांना आपण इतिहास विसरले आहात का ? असा टोमणाही शंभुसेना संघटनेने प्रसिद्धि पत्रकातुन पठाण यांना लावला आहे.
तसेच वारिस पठाणच्या वादग्रस्त विधानावर भाजपा, शिवसेना या राजकीय पक्षांनीही टीकेची झोड उठवत “पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये व वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असे म्हणत, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, अशा शब्दांत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पठाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं असून शिवसेेनेही पठाण यांच्या विधानाचा समाचार घेत पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच शंभुसेना सामाजिक संघटनेनेही ज्या कर्नाटकमध्ये हे विधान केले आहे त्या कर्नाटकात आणि केंद्रात भाजपाचीच सत्ता असून तात्काळ वाचाळवीर पठाण यांच्यावर कारवाई करावी,असं आवाहन शंभुसेना प्रमुख राजेशिर्के यांनी केलं आहे.
(वार्तांकन व छायाचित्र:पत्रकार,लक्ष्मीकांत शिर्के)