घोड धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासुन पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस कमी करून इतर पिकांकडे धाव घेतली चिखलठावाडी येथील भैरवनाथ सोसायटीच्या चेअरमन गौरी गणेश मैंद यांनी १३ गुंठ्यावर पॉलिहाऊस उभे केले. कलर मिरची, काकडी, शेवंती सारखी पिके जैविक पध्दतीने घेतली. कमी क्षेत्रात चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे मैंद परिवाराला पॉलिहाऊस शेतीची अविट गोडी निर्माण झाली आहे.
रमेश मैंद यांना वडिलोपार्जित ४० एकर शेती गणेश आणि राहुल ही दोन मुल गणेश बारावी पास तर राहुल ने दहावीतून शाळेला अलविदा केला. गणेशचे गौरी बरोबर विवाह झाला. रोहन, वैष्णवी ही दोन मुले झाली राहुलचा रुपाली बरोबर विवाह झाला. ओम व सई ही दोन मुलं झाली. मैद परिवार सहा सदस्यांचा शेती चाळीस एकराची शेती मनुष्यबळा अभावी कशी करायची असा प्रश्न होता. त्यामुळे ऊस शेती करण्याचा निर्णय घेतला पण पाणी टंचाईमुळे उत्पादनात मोठी घट झाली आणि शेतीत तोट्याचे गणित सुरू झाले.
अशा परिस्थितीत मशरूम तज्ञ तात्यासाहेब लखे तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभे केले पहिल्याच वेळी दैनंदिन कलर मिरचीचे उत्पादन घेतले त्यातुन मिरचीचा आर्थिक तडका जोरात झाला आणि काळाची गरज ओळखून पॉलिहाऊसची तीन शेड उभी केली आणि विविध कमर्शियल शेतीचा जलवा सुरू झाला आहे.
गौरी यांनी भैरवनाथ विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत पॉलिहाऊसकडे जीव ओतला आणि जाऊबाई रुपाली यांनी मोठी मदत केली त्यामुळे पॉलिहाऊसची शेती बहरली पुणे, मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मैंद यांची उत्पादन विकली जाऊ लागली. गणेश मैंद यांचा मार्केटिंगच्या निमित्ताने अनेक व्यापारी व ग्राहक यांच्याशी संवाद वाढला आणि बाजारपेठेत कोणत्या भाज्या कोणती फळे लागतात दुध कशा क्वालिटीचे लागते यांचा अभ्यास केला आणि तात्यासाहेब लखे यांच्याशी भागीदारी केली आणि चायनीज फळे भाजीपाला यांचा छोटा मॉल सुरू केला आणि यामधून नवा रोजगार नवी दिशा मिळाली या मॉल च्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानचा वापर करून मार्केटींगचे देशभर जाळे विणण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.
संदेश
पॉलिहाऊस शेती महिलांना संधी आता जादा क्षेत्रात शेती करून नफा कमविणायाचे दिवस संपले आहेत खराब हवामानामुळे उघड्यावर चांगला भाजीपाला येत नाही पॉलिहाऊस मध्ये असेल तर औषधे खते यांचा रेषो मेन्टेन करता येतो त्यामुळे ग्राहकांना चांगला दर्जाचा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे. आता महिलांनी घरात बसण्याचे दिवस संपले आपल्या पतीला शेतीत साथ केली. तर निश्चितच शेती चे चित्र बदलते आणि शेतीतून संसार सुखी होतो व लाईफ स्टाईल बदलते ही वस्तुस्थिती आहे. गौरी मैंद, चेअरमन – भैरवनाथ सहकारी सोसायटी, कणसेवाडी
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन),प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.
