उसाचे आगार असलेल्या वांगदरी गावात भगवान बाबुराव मोहिते (भुजबळ) यांनी कॉलेज जीवनापासून शरीराला पोषक असलेल्या चायनीज भाज्यांचे उत्पादन प्रोसेसिंग आणि मार्केटिंग करण्यास सुरूवात केली. वांगदरी च्या मातीत तयार झालेल्या चायनीज भाज्यांचा स्वाद सहा राज्यातील मॉल व फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये दरवळला आहे.
भगवान मोहिते यांना वांगदरी शिवारातील घोड नदीच्या वडिलोपार्जित सुमारे ४८ एकर शेती भगवान यांना विश्वनाथ, महादेव व संतोष हे तीन भाऊ विश्वनाथ शेतीत. महादेव शिक्षक तर संतोषचा ऑटोबॉईलचा व्यवसाय एकूण १७ सदस्याचे कुंटूब. वांगदरीच्या मळ्यात शेडनेट मध्ये शतावरी, ग्रीन टी, मलबेरी, आईस बर्ग चायनीज, कॉबेज रेड, कॉबेज थाई, जिंजीर मुखीणी, रोझमेरी, अॅवाकड, बेसील कलर मिरची, बेबीकॉर्न, चेरी टॉमेटो या सारख्या परदेशी भाज्यांचे पिक घेण्यास सुरुवात केली.
भगवान यांची पत्नी मनिषा, ऋतुजा व प्रणोती ह्या दोन मुली. भगवानराव यांनी शेतीत पिकविलेल्या भाजीपाल्याचे मार्केटींग करण्यासाठी हडपसर परिसरात एक टनाचे कोल्ड स्टोअर तयार केले आणि हिमालया ॲग्री डॉट कॉम ही कंपनी सुरू केली. या कामात पत्नी मनीषा यांची साथ लाभली.
भगवानराव यांनी कॉलेज मध्ये असताना नाशिक येथे जाऊन पाच सहा मित्रांबरोबर चायनीज भाज्यांचे उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण घेतले सन १९९६ मध्ये चायनीज भाज्यांची लागवड करण्यास सुरूवात केली. बाकीच्या मित्रांनी कष्टाच्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत म्हणून या शेतीला अलविदा केला. पण भगवान यांनी नाद सोडला नाही. सन १९९९ ला मनिषा बरोबर विवाह झाला.
भाजीपाल्याचे उत्पादन जबाबदारी बंधुवर सोपविली आणि भगवानराव यांनी मार्केटिंग करण्यासाठी पुणे गाठले आणि वांगदरीतील युवकांची फुटपाथवर बसुन भाजीपाला विकण्याची लढाई सुरू झाली. भगवानराव यांनी मेट्रो सिटीतील फाईव्ह स्टार हॉटेल व मॉल तसेच फुड बनविणाऱ्या कंपन्यांना कोणत्या प्रकारचा भाजीपाला किती प्रमाणावर लागतो याचा अभ्यास केला. मुंबईत मंत्रालयाजवळ चायनीज भाज्यांचे साप्ताहिक स्टॉल सुरू केले मार्केटींग चे पाच सहा ग्रूप तयार केले मार्केटींग चे नेटवर्क वाढविण्यासाठी प्लॅन आखला.
भगवान मोहिते यांचा भाजीपाला फाईव्ह स्टार हॉटेल व मॉल मध्ये विकू लागला काळाची गरज बाजार पेठेतील तेजी मंदीचा विचार करून काही भाजीपाला वळवून त्याची पावडर करणे तसेच लसणावर प्रकिया करणे यांचे युनिट वांगदरीत सुरू केले यामधून पाच सहा जणांना हक्काचा रोजगार मिळाला. मोहिते यांच्या ओल्या भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्या. भाजीपाल्यास परराज्यातील मेट्रो सिटीतुन मागणी होऊ लागली.
हिमालया ॲग्री ने भाजीपाला पॅकिंग करून बाजारात आणला ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी हिमालया ऍग्री डॉट कॉम ही वेबसाईट तयार केली अँप तयार केले आणि भगवानराव मोहिते यांच्या फुटपाथवरील व्यवसायाचे उद्योगात रूपांतर झाले. वांगदरीच्या मळ्यातील भाजीपाला कमी पडू लागल्याने मोहितेंनी महाबळेश्वर, नारायणगाव परिसरात चायनीज भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा ग्रूप तयार केला आणि या व्यवसायात इतर शेतकऱ्यांना पैसे कमवून देण्याची किमया केली.
मोहिते यांचा गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश मधील मेट्रो सिटीत हिमालया ॲग्री नावाने भाजीपाला विकला जात आहे हे १५-१७ वर्षातील भगवानराव यांचे कठोर परिश्रम आणि नियोजन घरच्या मंडळींनी दिलेली खंबीर साथ यांचे फलित आहे.
संदेश
या व्यवसायात सुरूवातीला खुप अडचणी आल्या तोटा झाला. पण भविष्य चांगले असल्याने मी थांबलो नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. गुणवत्ता ठेवली. ग्राहकांच्या डिमांड नुसार काही बदल स्विकारले या व्यवसायात चांगले दिवस आले. इतर तरुणांनी हा किंवा इतर व्यवसाय करावा मोठी संधी आहे पण कष्ट करण्याची सातत्य ठेवावे लागेल यश निश्चित मिळेल.भगवान मोहिते वांगदरी.
