कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक कोरोना पॉझिटिव्ह अनं.. विद्यार्थ्यांची ही तऱ्हा..! तहसीलदारांना लक्ष घालण्याची गरज..अन्यथा अडचण वाढण्याची शक्यता.

दिनांक २७ डिसेंबर, श्रीगोंदा:

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य कोरोना पॉझिटिव आले असल्याची माहिती समजली आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या ज्युनिअर कॉलेजचा एक प्राध्यापकही कोरोना पॉझिटिव आहे. असे असतांना ही कॉलेजमधील सत्र परीक्षा चालू आहे.

विद्यार्थ्यांना याबाबत माहिती समजल्यानंतर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना ही अंतर्गत माहिती सांगितली आहे. प्राध्यापक आणि प्राचार्य कोरोना पॉझिटिव असतांना भरलेल्या कॉलेजच्या गर्दीमध्ये तरुणाई विना मास्क कार्यक्षेत्रात वावरताना दिसत आहे. सॅनिटायझरचा वापरही होत नसल्याचे समजले आहे. त्यामुळे कॉलेजच्या आत शिरकाव झालेल्या कोरोनाच संक्रमण विद्यार्थ्यांमार्फत संक्रमित होऊ नये.. याची भिती आता वाढली आहे.

श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे साहेब यांनी या प्रकरणी लवकर दखल घालून, या कॉलेजला आदेश काढावेत जेणेकरून संक्रमण रोखता येईल. College Principal and Professor Corona Positive and .. like students ..! Tehsildar needs to pay attention..otherwise the problem may increase.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील काही शिक्षकांना संपर्क करून, चाललेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली असता, प्राचार्य व एक प्राध्यापक कोरोना संक्रमित असल्याचे समजले. मात्र, कॉलेज बंद करण्याचे अधिकार आम्हाला नसून, याबाबत पालक किंवा तहसीलदार यांनी सूचना केल्यानंतरच कारवाई करता येईल. असे त्यांनी सांगितले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply