विद्यार्थी काँग्रेसतर्फे भव्य ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन.

दिनांक १५ एप्रिल,श्रीगोंदा:

कोरोना महामारी व ३ मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमूळे सध्या शाळा, कॉलेज व सर्व विद्यार्थी घरातच बंद आहेत.या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे छंद जोपासले जात आहेत. परंतु आणखी नवयुवकांमध्ये जनजागृती व चैतन्य राहण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या प्रेरणेने,अहमदनगर जिल्हा व श्रीगोंदा तालुका विद्यार्थी काँग्रेस तर्फे सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शक्य तेवढी रक्कम पाठवून त्याचा स्क्रीनशॉट आयोजकांकडे पाठविण्याची अट ठेवली आहे. वयाची अट वय वर्ष ३० पर्यंत सर्व युवकांना भाग घेण्याची संधी उपलब्ध आहे.

‘हे विश्वची माझे घर’,’आजचा युवक दिशा आणि दशा’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे धोरण व बदलत जाणारी भारतीय अर्थव्यवस्था हे विषय निबंधासाठी दिले आहेत. प्रथम पारितोषिक डॉ. दिलीप भोस माजी सरपंच घोगरगाव यांच्यातर्फे २००१ रुपये,द्वितीय ग्रामसेवक कैलास तरटे १५०१रुपये, तृतीय पारितोषिक समीर शेख मा. उपसरपंच यांच्यातर्फे १००१ रुपयांचे ठेवण्यात आले आहे. बक्षीस वितरण कोरोना महामारी मुक्त झाल्यानंतर करण्यात येत आहे.भाग घेण्यासाठी स्मितल वाबळे मोबाईल. नंबर. ९९२३४९३३३३ व कपिल नागवडे मोबाईल नंबर.९८५०६७०८४५ व आदिल शेख ८८८८७७८ यांच्याशी स्पर्धकांनी संपर्क साधायचा आहे.

जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक गणेश भोस, समीर बोरा, स्मितल वाबळे, कपिल नागवडे, प्रा.कानिफनाथ उगले, प्रमोद मस्के, धीरज खेतमाळीस,प्रशांत भोस, जमीर शेख, रईस शेख, निशांत लोखंडे, निखिल गोरे, अभिषेक वाघ, शुभम पानसरे, अर्षद शेख, शोहेब शेख, शुभम वाघ, संकेत जंजिरे, निखिल हिंगणे, चैतन्य उल्हारे, संकेत उगले, ऋषिकेश ननवरे, कानिफनाथ शिंदे, शुभम शिंदे, सौरभ वाळके यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading