दिनांक १५ एप्रिल(येळपणे,श्रीगोंदा):
कोणाच्या पार्श्वभूमीवर देशात लोक डाऊन असल्यामुळे,कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. परंतु,ज्यांची परिस्थिती नाजूक आहे. अशा कुटुंबांचे हाल होत आहे.अशा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत.
याचाच एक भाग म्हणून,श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सौ कोमलताई महिंद्र वाखारे,श्रीगोंदा माजी पंचायत समितीचे सदस्य श्री.महेंद्र भाऊ वाखारी व VOPA या NGO संस्था यांनी मदत नव्हे तर कर्तव्य ही भावना डोळ्यासमोर ठेऊन येळपणे जिल्हा परिषद गटामध्ये गरजू कुटुंबांना घरपोच किराणा सामान वाटण्याचे काम सुरू केले आहे.
तसेच त्यांनी सारोळा कोरेगाव व म्हसे या गावातून गरजू कुटुंबांना किराणा वाटण्याचे काम सुरू केले आहे. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान त्यांनी सोशल डिस्टन्सिंगची पुरेपूर,काळजी घेतली आहे.
