धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याप्रकरणी, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दिनांक १५ एप्रिल(पेडगाव,श्रीगोंदा):

पेडगाव येथील एका युवकाने फेसबुक अकाऊंट च्या माध्यमांतून अक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करीत, बौद्ध समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य प्रसारित केले आहे.

१४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना,श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील जातीवादी रोहित भाऊ मोहिते याने फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होईल,अशी अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने बौद्ध समाजात नमूद व्यक्तीविषयी रोष निर्माण झाला. याप्रकरणी पेडगावातील सर्व तरुण कार्यकर्ते व आंबेडकरी तरुणांनी एकत्रित येत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.त्या अनुषंगाने भीमराव ज्ञानदेव म्हस्के यांच्या फिर्यादी वरून रोहित मोहिते याच्या विरोधात भादंवि कलम २९५(अ), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.नमूद घटना १४ एप्रिल रोजी ९ वाजून ५५ मिनिटांनी घडली आहे.

सामाजिक जाण नसलेल्या काही अज्ञान कार्यकर्त्यांमुळे दोन समाजामध्ये तेढ किंवा वैमनस्य निर्माण होण्याचे अनर्थ अशा कृत्यांमुळे होऊ शकते.या विषयी सर्वांनीच आपले आत्मभान जागृत ठेवून,सामाजिक बांधिलकी जपणे काळाची गरज आहे.

सामाजिक कार्यकर्ते व दलित चळवळीतील अभ्यासक नितीन घोडके (सर) यांनी या घटने संदर्भात मत नोंदवले:

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण अयुष्य मानवतेसाठी खर्च केले आहे.आजच्या युवकांनी त्यांच्या नावाचा वापर करुन,दोन समज्यात तेढ़ निर्माण करणे निंदनीय असून,समाज कुठल्या दिशेने जात आहे. याचा मानवतावादी लोकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading