दिनांक १६ एप्रिल(चिंभळा,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा गावांमध्ये प्रधानमंत्री गरीब योजनेअंतर्गत वाटण्यात येत असणारे गहू-तांदूळ या रेशन दुकानातील दुकानदाराकडून निर्देशाप्रमाणे धान्य वाटप केले जात नसल्याची तक्रार श्रीगोंद्याचे तहसीलदार यांना देण्यात आली आहे.सदर तक्रार सुरजीत शिरोळे यांनी दिली आहे.
सविस्तर असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येत आहे.
या आपत्ती मध्ये मार्ग करण्यासाठी भारत सरकारने “प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजने”मध्ये लोकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ देण्याचे निर्देश दिले असताना,ग्रामीण भागांमध्ये या सर्व प्रक्रियेला मूठमाती देण्याचा प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
चिंभळा या गावांमध्ये लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दोन किलो किंवा कमी धान्य दिले जात असल्याची तक्रार येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.आज दिनांक १६ एप्रिल रोजी तालुका पुरवठा अधिकारी पाचर्णे व साळुंखे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी ही बाब नमूद केली आहे.
रेशन धान्य दुकानदार गोरगरिबांच्या धान्याला जर कातर लावत असतील.तर,ही निंदनीय बाब असल्याचेही मतं आहेत. याविषयी पुरवठा अधिकारी यांना विचारणा केली असता,त्यांनी या दुकानदारावर वर तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान लेखी तक्रार दिल्यानंतर नमूद गावात या स्वस्त धान्य दुकानाच्या समोर अनेक लोकांनी विना पावती व कमी धान्य देण्यात आले असलेच्या तक्रारसाठी गर्दी केली असल्याचे समजले.
काही राजकीय कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी दुकानदार संजय गायकवाड याची बाजू धरत प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी तहसिलदार महेंद्र माळी यांनी तात्काळ कारवाई करावी,अशी या लोकांची मागणी आहे.
