तालुक्यात उद्या पासून कुकडीचे आवर्तन सुरू होणार : बबनराव पाचपुते.

पाणी सर्वाना मिळणार ; काळजी करू नका.

दिनांक १६ एप्रिल,श्रीगोंदा:

कुकडचे आवर्तन लवकर सुटले होते.मात्र, उद्यापासून आपल्याकडे म्हणजे,श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू होत आहे.पाणी सर्वांना मिळेल याबाबत कोठेही शंका नाही.सर्वांनी आपली काळजी घेऊन पाण्याचे नियोजन करावे. असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार पाचपुते यांनी म्हटले आहे की, ” आपल्याकडे (दिनांक १७ एप्रिल) पासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी लवकर सुटेल होते. मात्र,आपल्याकडे येण्यास उशीर झाला.ही वस्तुस्थिती आहे. या बाबत सल्लागार समितीच्या बैठकीत बोलू.परंतु, उद्यापासून सुटणारे पाणी सर्वांचे भरणे झाल्याशिवाय बंद करणार नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण ही वस्तुस्थिती सांगितली. येडगाव,माणिकडोहचा प्रश्न वरिष्ठांच्या कानावर घातला आहे. सर्वांना पाणी मिळेल हे नियोजन केले आहे.”

पाण्याचा अपव्यय शेतकऱ्यांनी टाळावा. शिवाय कोरोना व्हारसचे मोठे संकट आपल्या डोईवर आहे. त्याचा ही विचार करून सर्वांनी आवर्तन काळात आपली काळजी घेऊन प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत भरणे करावे. असे ही पाचपुते यांनी म्हटले आहे.

आजपासून श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील चारी नं. १४, १३, १२, ११, १० या चाऱ्यांना व १३२ लिंक कॅनाल पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.तसेच, विसापूर मधील आवर्तना मधून काही प्रमाणात भरणे वगळता बाकी मधून सर्व भरणे करण्यात आलेली आहेत. घोडचे आवर्तन हि पूर्ण होऊन घोड नदी मध्ये हि पाणी सोडण्यात आलेले आहे. त्याच बरोबर घोडेगावचा पण प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे.तसेच कुकडीच्या आवर्तना मधून कि.मी. ११० पासून वर ९० कि.मी. पर्यत वरचे सर्व भरणे होत आलेली आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading