कोणालाही उपाशी राहू देणार नाही.पाठीशी ग्रामीण विकास केंद्र आहे.

दिनांक १६ एप्रिल(काष्टी,श्रीगोंदा):

देशात सध्या कोरोना सारख्या जीवघेण्या आजारा च्या पार्श्वभूमीवर लॅाकडावून असल्याने, रोजचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दैनंदिन व्यवहार व रोजगार ठप्प झाले असून,ज्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही शाश्वत साधन नाही अश्या सर्वच भटके-विमुक्त,आदिवासी,वंचित समूहावर आज उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे ज्या तळागाळातील दुर्लक्षित व उपेक्षित वस्त्यांकडे जाऊन अशा सर्वच गरजवंतांना घरपोच किराणा देणार असल्याची माहिती अॅड.डॉ.अरुण जाधव (आबा) यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात संतवाडी,गायरान,काष्टी येथे आज दिनांक १६ एप्रिल रोजी ग्रामीण विकास केंद्र, लोकाधिकार आंदोलन कोरो,मुंबई या संस्थांच्या वतीने भिल्ल समाजातील २० कुटुंबांना किराणा मालाची वाटप करण्यात आली.यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेतील कार्यकर्त्यांनी आरोग्याची काळजी घेत, सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी १.५ मीटर अंतरावर बॉक्स आखून,प्रत्येक व्यक्तीला बॉक्समध्ये उभे करून किराणामाल देण्यात आला.या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचा एकच कार्यकर्ता किराणा वाटण्यासाठी होता.उपस्थित सर्वांनी तोंड बांधलेले होते.

अशाप्रकारे शासनाच्या नियमाप्रमाणे आरोग्याची काळजी व गरजवंतांना गायरान संतवाडी काष्टी येथे मदत देण्यात आली.यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेकडून संतोष भोसले,अमोल बबन पवार पंचायत समिती सदस्य श्रीगोंदा, चांगदेव रामदास पाचपुते ग्रामपंचायत सदस्य काष्टी, महेश दीलीपराव ढोकर ग्रामपंचायत सदस्य काष्टी हे उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद रुपी हास्य दिसत होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading