कोतवाल,पोलीस पाटील, ग्रामसेवक,तलाठी,होमगार्ड व ईतरांनाही विमा संरक्षण द्या :-राजेश डांगे.

दिनांक १७ एप्रिल, श्रीगोंदा:

आरोग्य कर्मचारी,पोलीस,महसूल विभाग यासोबतच ग्रामीण भागात पोलीस,पाटील, कोतवाल,होमगार्ड, गा्मपंचायत कर्मचारी देखील लॉकडॉऊनच्या काळात सरकारी घटकासंह सेवा देणारे स्वयंसेवक यांना देखील शासनाने विमा संरक्षण द्यावे.अशी मागणी नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष-राजेश डांगे यांनी मुख्यमंञी ऊद्धव ठाकरे यांना ई.मेल द्वारा निवेदन पाठवून केली आहे.

कोरोणा विषाणूच्या विरोधातील लढाईत लॉकडॉऊनच्या काळात राज्यातील, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी,सर्वच महसूल व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी,यासह कोरोणा विषाणू या आजारावरील संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सरकारी घटकांसह सेवा देणारे स्वंयसेवक यांचाही शासनाने २५ लाख रुपयांचा विमा काढणे गरजेचे आहे.

पोलीस प्रधासनाने जिल्हात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.तर,गावपातळीवर वित्त आयोगाच्या निधीतून गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामसेवक व ग्राम पंचायत कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहे. केंद्र सरकारने घोषीत केलेल्या १ लाख ७० हजार कोटींच्या पैकेज मधील मदत घरपोहच देण्यासाठी,महसूल विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.या सर्व घटकांना आपला जीव धोक्यात घालून कर्तव्याला प्रथम पसंती दीली आहे.

सोबतच कोतवाल, पोलास पाटील,ग्रामसेवक, तलाठी,होंंमगार्ड यांच्यासह लॉकडॉऊनच्या काळात काम करनाऱ्या सर्व सरकारी घटकांसह सेवा देणारे स्वंयसेवक यांना देखील राज्य सरकारने विमा संरक्षण कवच द्यावे,अशी मागणी ई मेल द्वारा निवेदन देवून डांगे यांनी राज्यसरकारला केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading