दिनांक १७ एप्रिल,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील एका छोट्या गावात वास्तव्यास असलेले.मात्र,कामानिमित्त शहरात कर्तव्यावर असणारे एक पोलीस कर्मचारी नुकतेच आजारपणाची सुट्टी घेत गावाकडे आले आहेत. काही दिवसांपासून त्यांना ताप, अंगदुखी असा त्रास जाणवत होता. गावाकडे आल्यावर त्यांना रक्ताची उलटी झाली.त्यामुळे त्यांना स्थानिक आरोग्य उपकेंद्रात तपासून नगरला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
तालुक्यातील पहिल्या एका संशियताचा रिपोर्ट येणे बाकी असतानाच,आता नव्याने एक संशयित रुग्ण पुढे आल्याने श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोरोणाविषयी संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा प्रशासन सह स्थानिक प्रशासन कोरोना साथ प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात सतर्क आहेत.विशेषता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कोरुना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी कायदेशीर उपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्याची तंतोतंत अंमलबजावणी श्रीगोंद्याचे( तहसीलदार) महेंद्र माळी,(तालुका आरोग्य अधिकारी) डॉ.नितीन खामकर,(श्रीगोंदा पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव सह त्यांचे कर्मचारी जबाबदारी ने लक्ष देत आहेत. सोशियल डिस्टन्स ठेवण्यासाठी तालुका कार्यक्षेत्रात पोलीस गस्त घालताहेत. अत्यावश्यक सेवांसाठी वेळेचे बंधन लागू करण्यात आलेले आहेत.श्रीगोंदा वाशीयांचा कोरोनाच्या लढाईत प्रशासनाला चांगला पाठिंबा असल्याने,तालुक्यात अजून तरी कोरोनाने शिरकाव केलेला नाही आणि यापुढेही तालुक्यातील परस्थिती चांगली राहील अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
