दिनांक १ ऑगस्ट,श्रीगोंदा:
कु. प्रतीक्षा दिलीप तुपे हिने एस.एस.सी.परीक्षा २०२० मध्ये ९६.२० % गुण मिळविले. या तिच्या यशाबद्दल श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना नगरे मॅडम, उप. मुख्या. सौ. चौधरी मॅडम, पर्यवेक्षक श्री.भुजबळ सर, गुरुकुल प्रमुख श्री खेडकर सर, वर्गशिक्षक, श्री. ऐकाड सर, ससाणेसर, दरेकर सर, कोकणी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रतीक्षा ही हिरडेवाडी शाळेच्या प्राथमिक शिक्षीका सौ. संगीता व रयत सेवक श्री. दिलीप तुपे यांची कन्या आहे.या तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यालयाचा निकाल १०० % लागला असून ९० च्या पुढे ५१ विद्यार्थीनि आहेत. अशी माहिती विद्यालयाकडून मिळाली आहे.
स्रोत:(विद्यार्थी, पालक व विद्यालयाकडून मिळालेली माहिती)
