दिनांक २७ नोव्हेंबर(मढेवडगांव,श्रीगोंदा):
भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची उद्देशिका यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामसेवक माने भाऊसाहेब यांच्या वतीने करण्यात आले.
भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या ! असे आवाहन राहुल साळवे यांनी केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या विषयी समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने २००८ मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे, अशी माहिती मढेवडगांवचे नवनियुक्त ग्रामसेवक माने भाऊसाहेब यांनी दिली.
संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून, संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी,असे आवाहन राहुल साळवे यांनी केले आहे.
यावेळी मढेवडगांवचे (तंटामुक्ती अध्यक्ष) सचिन उंडे, (माजी उपसरपंच) गणेश मांडे, (सदस्य) बापूराव मांडे, दिपक गाडे,(सामाजिक कार्यकर्ते) राहुल साळवे, (एफ. डी. आय. बँकेचे अधिकारी) दीपक ससाणे, मांडे काका, किशोर इरोळे, बापू साळवे, अमोल गाढवे, रघुनाथ साळवे (ग्रामपंचायत कर्मचारी) शुभम वाबळे, ज्ञानदेव साळवे, मिनींनाथ ससाणे हजर होते.
स्रोत:(विजय मांडे यांनी प्रसिध्दीस दिलेली माहिती)
