दिनांक २७ नोव्हेंबर, श्रीगोंदा:
२६ नोव्हेंबर हा भारतीय राज्यघटना दिवस तसेच संविधान दिन म्हणून, सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही लिखित राज्यघटना देशाला अर्पण केली होती. या दिनाचे महत्व म्हणून २०१५ साली केंद्र शासनाने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून, साजरा करण्याची घोषणा केली.

यापूर्वीही पुरोगामी चळवळीसह घटना मानणाऱ्या लोकांकरवी हा दिवस संविधान दिन म्हणून, साजरा केला जात होता. त्यानुसार श्रीगोंद्यातही संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्व भारतीयांचा राष्ट्रीय सण, मानव मुक्ती दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून, संत शेख महंमद महाराज पटांगण श्रीगोंदा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक ऐक्य परिषद ,सावित्री फातिमा मंच व फुले – शाहू – आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत सौ. अनुराधाताई नागवडे, डॉ. रफिक सय्यद, पोलीस निरीक्षक राजाराम ढिकले होते.
या कार्यक्रमासाठी मुकुंद सोनटक्के, संभाजीराव बोरुडे, बाप्पू माने सह फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेतील कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रमानुसार)
