‘भारतीय संविधान संघर्ष समिती’ च्या वतीने ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा..!

दिनांक १ डिसेंबर(पेडगाव, श्रीगोंदा):

तथागत नगर, पेडगाव ता. श्रीगोंदा येथे संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संघर्ष समिती पेडगाव युनिटच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याप्रसंगी विविध मान्यवरांना संविधानाची प्रत देऊन गौरवण्यात आले. तसेच ऍड. नितीन घोडके (सर) यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते दीपक म्हस्के यांनी प्रबोधनात्मक सामूहिक गीत सादर करीत, संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी ग्रा. सदस्य प्रकाश घोडके, मा. ग्रा. सदस्य संतोष शिंदे, आमोल घोडके, सनि कांबळे, अनिकेत घोडके, विनोद म्हस्के, लखन पांढरे, प्रवीण ओव्होल, श्रेयस गलंगे, विजय वाघमारे, संदीप ओव्हळ, शुभम शिंदे, साजन भोसले, ह्रतिक म्हस्के, श्रीमती वर्षी घोडके, कोमल म्हस्के तृप्ती म्हस्के, दीक्षा म्हस्के, इंजि. प्रकाश म्हस्के, तनुजा घोडके, सोहम घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(दीपक म्हस्के,पेडगाव)

Leave a Reply