महामानव बाबा आमटे संस्थेतील अनिल पवार या विद्यार्थ्यांने लिहलेली रामा अब्दुल काळे देऊळगाव तालुका श्रीगोंदा येथील आदिवासी तरुणाची ही कहाणी.
फासेपारधी समाजातील जन्म घेतलेले हा युवक महामानव बाबा आमटे संस्थेशी गेल्या ५ वर्षांपासून परिचित आहेत. त्याचा मुलगा माऊली आणि मुलगी अंगुरी हे दोघेही संस्थेत निवासी आहेत .
रामा हा फासेपारधी जमातीचा,आज ही लोक पारधी समाजाकडे गुन्हेगार म्हणून पाहतात,त्याची आई खूप कष्टाळू वडील ही खूप कष्ट करणारे होते.त्यामुळे रामा ला कष्टाची आवड निर्माण झाली.त्याला त्याच्या परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही.
लहान वयातच त्याचे लग्न झाले, कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली. आपली पुढील पिढी घडावी आपण जसे जगलो ते दुःख आपल्या मुला-मुलींना मिळू नये यासाठी रामाने कष्टाचा मार्ग स्वीकारला.
रामाचा संपूर्ण परिवार हा निरक्षर आहे.रामाच्या तिसऱ्या पिढीतील अंगुरी माऊली शाळेत जाणारे मुले आहेत.रामाला मिळेल ते काम , मजुरी करून रामा परिवाराची उपजीविका करून आपला उदरनिर्वाह करतो. चिंचा झोडून त्या विकणे, मध गोळा करणे, रस्त्यावरील कामात खडी टाकणे, बिगारी म्हणून काम करणे आदी कामे रामा आजही करतो आहे.
परंतु निसर्गातील बदल व कायमस्वरूपी एखादे काम न मिळणे यामुळे त्याने ऋतूनुसार व्यवसाय करण्याचे त्याने ठरविले. त्यातून त्याने उन्हाळ्यात गारीगार, कुल्फी विकण्याचे ठरविले.
गेल्या तीन वर्षांपासून रामा प्रत्येक उन्हाळ्यात कुल्फी विकण्याचे काम करीत आहे. देऊळगाव शेजारील जवळपास १० गावात आपल्या जुन्या मोटारगाडीवर जाऊन तो कुल्फी विकण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत आहे.
तो दररोज साधारणपणे १००० रुपयां पेक्षाही जास्त रुपयाच्या कुल्फी विकतो.यातून त्याला दररोज साधारणपणे ३०० ते ४०० रुपये नफा मिळतो.
अज्ञानामुळे आपल्याला काही करता आले नाही.याची सल रामाच्या मनात कायम होती.
महामानव बाबा आमटे संस्थेत आपल्या मुलांना शिक्षणासाठी टाकले व प्रत्येक उन्हाळयात न चुकता संस्थेतील सर्व मुले व सेवक वर्गाला न चुकता मनसोक्त कुल्फी, गारीगार खाण्याची मजा देत असतो. कष्टकरी काम, रामाची कुल्फी खाताना मुलांच्या व रामाच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जाते.
फासेपारधी समाजातील होणारा हा बदल नक्कीच पुढील पिढी ही अंधश्रद्धेतून बाहेर पडेल.कष्ट करून पायावर उभी राहील.यात कोणतीच शंका नाही.
सध्या करोना साथ आहे अवघे जग चिंतेत आहे. रामा असाच भेटला.त्याला विचारले रामा गारी गार धंदा बंद केला का ? तेव्हा त्याने उत्तर दिले सर सगळीकडे लोकांना जीवाची चिंता आहे.थंड खाल्याने वाढतो समजले! म्हणून,ह्या वर्षी पूर्ण धंदा करणे शक्य नाही. आपल्या मुळे लोक अडचणीत नको येयला,हा ‘रामाचा’ प्रामाणिक पणा प्रेरणादायी आहे.
अनिल पवार,
महामानव बाबा आमटे संस्था श्रीगोंदा( विद्यार्थी )
