दिनांक १ मार्च (बेलवंडी, श्रीगोंदा):
बेलवंडी पोलीस ठाण्यातील कोरोना लस घेतलेल्या एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी बेलवंडी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना त्रास जाणवत होता.त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात पाच कर्मचारी व एक अधिकारी काेरोना बाधित आढळले. यात एक महिला कर्मचारी ही आहे. मात्र, सध्या सगळ्यांची प्रकृती चांगली असून, त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
स्त्रोत:(गुगल)

