दिनांक १ मार्च, श्रीगोंदा:
सर्व सामान्यांना मुंबईला जाण्यासाठी परवडनारी साई एक्सप्रेस येत्या ११ मार्च पासून सुरु होणार आहे. परंतु, राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा दिला नसल्याने या तालुक्यातील प्रवाशी नाराज झाले असून, थेट मुंबईला जाण्यासाठी ते आता वंचित राहणार आहेत.

साई शिर्डी एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा या रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवाश्यांची सोय करावी. अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
खा. डॉ. गिरीष बापट, खा. सदाशिव लोखंडे व खा. डॉ. सुजय विखे यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
स्रोत:(गुगल)

