वहिनीच्या हत्येप्रकरणी चुलत दिराला जन्मठेप.. श्रीगोंद्यात वास्तव्यास असलेल्या मुलाने तक्रार दिल्यावर प्रकार उघड..

दिनांक २२ डिसेंबर २०२५, श्रीगोंदा/पुणे:

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील सुमनबाई गोरड या महिलेची २०१७ मध्ये पैशांच्या वादातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयाने आरोपी चुलत दीर धुळा बाबा गोरड (४२) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जाहिरात

उसने दिलेल्या पैशांवरून झालेला वाद.. आरोपीने सुमनबाईंच्या डोक्यात दगड आणि पाईपने प्रहार करून त्यांची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडून टाकला.

मृत सुमनबाईंचा मुलगा आनंद हा श्रीगोंदा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. आई घरी न परतल्याने त्याने पोलिसांत तक्रार केली, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

https://amzn.to/49oGPK4

मा.न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी आरोपीला जन्मठेप, १५ हजार रुपये दंड आणि पीडित मुलाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading